ए. टी. एस. ई. वैराग 
परीक्षा फॉर्म -


राज्यस्तरीय ए टी एस प्रज्ञाशोध परीक्षेचे नियम

* परीक्षेबद्दलची माहिती आमच्या अधिकृत प्रतिनिधींकडे मिळेल.

* गुणवत्ताधारकांची संख्या सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येवर कमी जास्त प्रमाणात होईल.

* गुणवत्ता क्रमांक सर्व स्तरीय समान गुणांचे एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर बक्षिसाची रक्कम विभागून दिली जाईल. तसेच जिल्हास्तरीय क्रमांकामध्ये पहिल्या एक (1)ते तीन (3) क्रमांकामध्ये पाच (5) पेक्षा जास्त विद्यार्थी असतेल तर फक्त एका विद्यार्थ्याला जो वयाने लहान ज्याची जन्म तारीख कमी असेल त्यालाच रोख रक्कम चे बक्षीस देण्यात येईल बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सर्टिफिकिट देण्यात येईल. याची सर्व शिक्षकांनी व पालकांनी नोंद घ्यावी.

* पारितोषिकांची संख्या अगर रक्कम कमी जास्त करण्याचा अधिकार परीक्षा संचालकांनी राखून ठेवला आहे.

* कृपया तुमच्‍या तक्रारी लेखी स्‍वरुपात परीक्षा संचालकांकडे पाठवा.

* कृपया सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळातच फोन करावा.

* पाल्याला परीक्षा केंद्रावर नेण्याआणण्याची जबाबदारी पालकांची राहील.

* परीक्षेच्या दिवशी केंद्रावर अचानक काही अन्य कार्यक्रम आयोजित केला गेल्यास पर्यायी परीक्षा केंद्राची व्यवस्था केली जाईल. त्यामुळे परीक्षा अर्धा किंवा एक तास उशिरा सुरु होण्याची शक्यता असते. उशिरा सुरू झालेली परीक्षा तेवढाच वेळ उशिरा संपेल. अशावेळी आपले सहकार्य आमच्या जिल्हा / तालुका समन्वयकांना आवश्यक आहे.

* परीक्षा केंद्रावर जागेअभावी जमिनीवर बसावे लागेल. त्यासाठी विद्यार्थ्याने पॅड /आसनपट्टी आणणे आवश्यक आहे.

* परीक्षेच्या दिवशी इतर कोणत्याही अन्य परीक्षा आयोजित केल्या असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाणार नाही.

* एखाद्या सेंटर साठी 150 विद्यार्थी न जमल्यास त्या सेंटरवरील विद्यार्थ्यांना जवळच्या गावी असलेल्या सेंटरवर स्वखर्चाने जाऊन परीक्षा द्यावी लागेल.

* परीक्षा तारीख पालकांचे किंवा फॉर्मवर नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर परीक्षेच्या 15 अगोदर एस.एम.एस.ने कळविले जाईल.

* सर्व न्यायालयीन वाद सोलापूर न्यायालयाअंतर्गत आहेत.